Home Cities जळगाव एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द


जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आलेला आहे,

 

 

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपूर्ण देशभरात 14 एप्रिल 2020 पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे एप्रिल 2020 मधील पहिल्या सोमवारी होणारा 7 एप्रिल, 2020 चा नियोजित जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


Protected Content

Play sound