एप्रिलपर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लस

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं. तसंच पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना करोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निकालानंतर जो बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प हेदेखील आपला पराभव स्वीकारण्यास तयार नाही. निवडणुकीच्या निकालांतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे पहिलंच सार्वजनिक भाषण आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध कंपनी फायझरच्या लसीबद्दल नवी माहिती दिली. “काही आठवड्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि अतिजास्त धोका असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल. आमच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला फायझरची लस मोफत देण्यात येणार आहे,” असंही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, जो बायडेन यांना एरिझोना आणि जॉर्जिया प्रांतातदेखील विजय मिळाला. शुक्रवारी त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. डेमोक्रेटिक पक्षाला ३०६ तक रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल़्ड ट्रम्प यांना २३२ मतं मिळाली. ट्रम्प यांना नॉर्थ कॅरोलिनामध्ये विजय मिळाला.

 

तथापि, लस तयार आहे असा या घोषणेचा अर्थ नाही. माहितीवर देखरेख ठेवणाऱ्या स्वतंत्र मंडळाने केलेल्या अंतरिम विश्लेषणात लशीच्या तपासणीत ९४ जणांच्या चाचण्याचा आढावा घेण्यात आला. अमेरिकेसह इतर ५ देशांमधील सुमारे ४४ हजार लोकांची या अभ्यासासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

Protected Content