एन.एम.एम.एस. परीक्षेत श्रुतिका तेली हिचे यश

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील श्रुतिका प्रवीण तेली ही  राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (२०२० – २१) परीक्षेत  जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांक पटकावत गुणवत्ता यादीत आली आहे. 

 

श्रुतिका तेली हिने  यापूर्वी सुद्धा केंद्रीय नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या  निवड पूर्व परीक्षेत सुद्धा मार्च महिन्यात ती जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत चमकली होती.  तिची निवड जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव येथे इयत्ता नववीसाठी झाली आहे.  तिने या सर्व परीक्षांचा अभ्यास मागील वर्षी घरी बसूनच केला आणि यश संपादित केले. यासाठी तिला तिचे आई, वडील आजी, आजोबा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तिने संपादन केलेल्या यशामुळे संपुर्ण स्तरातून तिची प्रशंसा होत आहे. श्रुतिका ही समृद्धी फॉऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच एल. आय. सी. चे जेष्ठ विमा प्रतिनिधी प्रविण आर. तेली यांची जेष्ठ कन्या आहे.

 

Protected Content