एक सच्च्या देशभक्ताचा पुत्र असल्याचा मला अभिमान : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होतो, अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे,अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त आज श्रद्धांजली अर्पण केली.

 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होतो. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी महत्त्वाची पावले उचलत देशाचे सक्षमीकरण केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना प्रेम आणि कृतज्ञतेने अभिवादन करतो, असे राहुल गांधी म्हणाले. राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी त्यांची तामिळनाडूतील श्रीपेरुंबुद्दूर येथे एका निवडणुकीच्या सभेदरम्यान एलटीटीई या दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ल्यात हत्या केली होती.

Protected Content