जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून जळगाव शहरातील शाहूनगर येथील माहेर असलेला विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहू नगर येथील माहेर असलेल्या सना परवीन शेख तवक्कल वय 28 यांचा एरंडोल तालुक्यातील उतराण येथील तवक्कल शेख यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी सना हिने तिच्या माहेरून एक लाख रुपये आणावेत अशी मागणी पती सासरच्या मंडळींनी केली. माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने सना ह्या पैसे देवू शकल्या नाहीत, या कारणावरून सना हीचा पतीसह सासरच्या मंडळींनी वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच तुला फारकत देवून टाकू अशी धमकी, सना यांना दिली. या छळाला कंटाळून सना शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली . या तक्रारीवरून गुरुवारी सना हिचे पती तवक्कल शेख रा. उत्रान ता. एरंडोल, हुसेन खान गुलाब खान, सईदाबी हुसेन खान, रा. नुरानी मोहल्ला, पारोळा, शेख नाशिर शेख आमिर, नमी दर्म शेख नाशीर दोन्ही रा.अमळनेर, शेख सलीम , मट्टो बी शेख सलिम दोन्ही रा. पिंप्राळा, जळगाव या सात जणांविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.