एका भागातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । फेसबुकवर झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीला जंगलात बोलावून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, त्यानंतर पाठलाग करत मुलीला त्रास देत लग्नासाठी धमकी दिल्याचा प्रकार जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी १६ वर्षाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. या अल्पवयीन मुलीची जानेवारी महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत ओळखी झाली. यातून मुलगा व मुलगी हे दोघे एकमेकांना  चॅटींग करत होते. दरम्यान महिनाभरानंतर ओळखीतून मुलगा १४ फेब्रुवारी रोजी मुलीचा विश्वास संपादन करत तिला जळगाव शहरात लगत असलेल्या एका तलाव परिसरातील जंगलात फिरायला घेवून गेला. याठिकाणी मुलाने मुलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य  करत तिचा विनयभंग केला. यानंतर तरुणाने १४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान मुलगी जिकडे जायची , तर मुलगा हा तिचा पाठलाग करुन तिला त्रास देतो. एवढेच नाही तर मुलगा मुलीला अधूनमधून रात्री बेरात्री अश्लिल चॅटींग सुध्दा करतो, माझ्याशी लग्न कर असे मुलीला म्हणत असतो, व लग्न नाही केले तर तुझ्या वडीलांना मारुन टाकेन अशी धमकी यादरम्यानच्या काळात मुलाने मुलीला दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराला कंटाळलेल्या मुलीने ६ मार्च रोजी तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या वडीलांना सांगितला, त्यानुसार मुलीच्या वडीलांनी दुसऱ्या दिवशी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन मुलीला त्रास देत तिचा विनयभंग करणाऱ्या १६ वर्षाच्या मुलाविरोधात विनयभंग तसेच बाल लैंगिंग अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहेत.

Protected Content