Home आरोग्य एका दिवसात ८१ हजार कोरोनाबाधित

एका दिवसात ८१ हजार कोरोनाबाधित

0
20

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे दिसून येत असतांना आज ती संख्या वाढतांना दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला.

मागील चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसंच १ हजार ०९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं. सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशात १० लाख ९७ हजार ९४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसंच आतापर्यंत देशभरात ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound