एका दिवसात २ हजार कोरोनामृत्यूचे चिंता वाढवणारे चक्रव्यूह

 

 

 नवी दिल्ली :  वृत्तसंस्था । देशात कोरोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे,  दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना  २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ झाली आहे. 

 

देशातील रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहोचली आहे.

 

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

 

सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेश (२९ हजार ५७४), दिल्ली (२८ हजार ३९५), कर्नाटक (२१ हजार ७९४)आणि केरळचा (१९ हजार ५७७) समावेश आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा मोठा वाटा आहे. ५४.७२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. २४ तासांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र (५१९) आणि दिल्लीत (२७७) झाले आहेत.

Protected Content