एका घरात दोन खासदार ही आमच्या पक्षाची संस्कृती नाही : एकनाथराव खडसे

 

मुंबई (वृत्तसंस्था) मी कधीही राज्यसभेचा दावेदार नव्हतो. ही गोष्ट खरी आहे की, काही जणांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की मला ही जागा मिळावी. मात्र, यामुळे कसलाही अपेक्षाभंग झालेला नाही. कारण मी राज्यसभेचा दावा केलाच नव्हता. याशिवाय एका घरात दोन खासदार ही आमच्या पक्षाची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा होती, हे खरं आहे. मात्र, भाजपकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती, पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा होती, पण मला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती. मुळात मला राज्याच्या राजकारणात जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच माझ्या नावाचा विचार पक्षाने केला नसावा. मला देशाच्या नाही तर राज्याच्या राजकारणातच रस आहे. मी राज्याच्या राजकारणात कायमच सक्रीय होतो आणि आजही, असेही खडसे म्हणाले. दरम्यान,  गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असलेल्या खडसेंना राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. विशेष राज्य भाजप कार्यकारिणीकडून त्यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे

Protected Content