मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे आज मुंबई येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले असून ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत.
एकनाथराव खडसे हे आज साडेबाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने मुंबई येथे जाणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. तथापि त्यांना जाण्यासाठी थोडा विलंब झाला असून ते दोन वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने मुंबई येथे रवाना झाले आहेत. मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावरील हेलिपॅड वरून ते खाजगी हेलिकॉप्टरने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे व कन्या रोहिनी खडसे यादेखील मुंबई येथे गेल्या आहेत
दरम्यान उद्या दुपारी दोन वाजता एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून यावेळी त्यांच्यासोबत दहापेक्षा जास्त माजी आमदार देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.