Home Cities जळगाव एकनाथराव खडसे यांच्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी

एकनाथराव खडसे यांच्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी


 

मुंबई प्रतिनिधी । ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता ८ मार्चला सुनावणी होणार आहे.

 

भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून एकनाथराव खडसे यांची ईडीने चौकशी केली आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी अपेक्षित होती. मात्र न्यायालयाने यावर आता ८ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. यामुळे आता खडसे यांना पुन्हा अल्प काळ दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound