जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कोरोना चाचण्यांचे २अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत . त्यामुळे त्यांच्या प्रकृती नंद्द्ल समर्थकांनी आणि जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे .
काल दुपारी पहिला चाचणी अहवाल पसिटीव्ह आल्याचे निदान झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला होता . त्यांच्या प्रकृतीचा पूर्वेइतिहास लक्षात घेता कुटुंबियांसह सगळेच थोडे काळजीत पडले होते . त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे -खेवलकर यांच्यावरही कोरोना आजाराचे उपचार सुरु असल्याने एकनाथराव खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे अशी ठाम समजूत सर्वांची झाली होती
कालच रात्री त्यांच्या पुन्हा २ चाचण्या केल्या गेल्या . या २ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले . आता काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रवास किंवा भेटीगाठींचे नियोजन करावे लागणार आहे . आरामासाठी कदाचित ते मुंबईत थांबणेच पसंत करू शकतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले .
कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे मुंबईमध्ये बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली दरम्यान, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये’, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं होतं.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी चर्चा होती. पण त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हा आल्याने त्यांना सध्या घरीच विश्राम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.