मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर येत आहे.
स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसड हे आमदार निवृत्त झाले आहेत. वाढलेल्या आमदारांमुळे भाजपला १ जागा जादा मिळेल. त्यामुळे विधानसभेतील संख्याबळ पाहाता भाजप ४ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रकाश मेहता, माधव भंडारी आदी जण इच्छुक आहेत. दरम्यान, खडसे यांनी विधान परिषदसाठी आपण इच्छुक असल्याचे म्हटले असले तरी, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. खडसेंनी गोपीनाथ गडावर चंद्रकांत पाटलांसमोरच भाषणातून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय नेतृत्वाला ही बाब आवडलेली नाही. त्यामुळे खडसे इच्छुक असले तरी त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.