पिंपरी (वृत्तसंस्था) एकच फ्लॅट नऊ ते दहा जणांना विक्री केल्याप्रकरणी सोलापूर भाजपच्या उपमहापौराला सांगवी ताब्यात घेतले आहे. राजेश काळे असे ताब्यात घेतलेल्या उपमहापौराचे नाव आहे.
आरोपी काळे याने सांगवी येथील एक फ्लॅट नऊ ते दहा जणांना विक्री केला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीदारांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गेल्यावर्षी आरोपी काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सांगवी पोलिसांच्या पथकाने आरोपी काळे याला शुक्रवारी सोलापूर येथून ताब्यात घेतले.