चाळीसगाव,प्रतिनिधी| उसनवारीने पैसे मांगीतल्यावर दिले नाही म्हणुन एकास जबर मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील अंधारी येथे उघडकीला आली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील अंधारी येथील बळीराम अभिमान पवार (वय-२८) यांच्याकडे युवराज हंसराज राठोड रा. अंधारी ता. चाळीसगाव यांनी उसनवारीने पैसे मागितले. परंतु पवार यांनी पैसे दिले नाही म्हणुन युवराज यांनी त्याला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीला आहे. हि घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास शेवरी गावाबाहेर घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात बळीराम अभिमान पवार यांच्या फिर्यादीवरून भाद्वी कलम ३२४,५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशेनुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहे.