जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीचे पैसे फेडण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार ३० नोंव्हेंबर रेाजी दुपारी ४ वाजता पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अक्सानगरातील माहेर असलेल्या नाजीया परवीन शेख जियाउद्दीन (वय-३२) यांचा विवाह चोपडा शहरातील जियाउद्दीन शेख उस्नोउद्दीन यांच्याशी २००५ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. संसाराचा गाडा सुरू असतांना पती जियाउद्दीन याला दारूचे व्यसन जडले. यात काम धंदा न करता लोकांकडून हातउसनवारी केली. उसनवारीचे पैसे फेडण्यासाठी विवाहितेला माहेरहून १ लाख रूपये आणावे अशी मागणी पतीने केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता जळगावातील अक्सानगरात माहेरी निघून आल्या. बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती जियाउद्दीन शेख उस्नोद्दिन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.
उसनवारीचे पैसे फेडण्यासाठी विवाहितेला १ लाखाची मागणी
2 years ago
No Comments