जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील एकाने मित्राच्या नात्याने व्यवसाय करण्यासाठी उसनवारीने दिलेले पैसे परत न करणाऱ्या मित्राला जळगाव जिल्हा न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच नुकसान भरपाई म्हणून ४ लाख ५० हजार रुपये परत करण्याचे आदेश दिले आहे.
शिवाजी नगरातील रहिवाशी आरिफ शेख खलील यांनी अकबर नजीर पाशा याला मैत्रीच्या नात्याने व्यवसाय करण्यासाठी उसनवारीने ४ लाख रुपये दिले होते. याबाबत सिक्युरिटी म्हणून त्याबद्दल नोटरी करुन अकबर नजीर पाशा याने दोन चेक दिले होते. अकबर नजीर पाशा हे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आरिफ शेख खलील यांनी दिलेले चेक बँकेत टाकले, परंतू चेक बँकेत वटला नाही. त्यामुळे आरिु शेख खलील यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता, न्यायदंडाधिकारी जे. एस. केळकर यांनी आरोपी अकबर नजीर पाशा याला एक वर्ष कारावास व ४ लाख ५० हजारांचा दंड म्हणून नुकसान भरपाई म्हणून आरिफ शेख खलील यांना देण्याचे आदेश दिले आहे. फिर्यादीतर्फे ॲड. राशिद पिंजारी व ॲड. शाहीद खान यांनी कामकाज पाहिले.