जळगाव, प्रतिनिधी । येथील उल्का फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून प्रोट्रेट्स ऑफ कोरोना वारियर्स उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून यात लहान मुलं देखील मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत.
संयम बाळगून घरात राहणारा प्रत्येक नागरिक हा कोरोना वारियर्स आहे.अशा कोरोना वॉरियर्स ची व्यक्तिचित्रे उल्का फाऊंडेशनकडून रेखाटली जात आहे. यातून येणारी मिळकत ही, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. फाऊंडेशनच्या या आवाहनाला जळगाव वाघ नगर येथील श्रावस्ती किरण सोनवणे या ९ वर्षाच्या चिमुकली ने प्रतिसाद देऊन आपले व्यक्तिचित्र रेखाटून समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चिमुरडीने आपल्या वाढ दिवसाच्या केकची रक्कम ही, उल्का फाऊंडेशनच्या या उपक्रमाला दिली. तसेच मी घरातच थांबून कोरोनाला हरवेल आणि कोरोना वॉरियर होईल असा संकल्प केला आहे. माझ्या शाळेतील मित्र मैत्रिणींना सुध्दा हा संकल्प करण्याचे आवाहन करणार आहे.असे या चिमुरडीने सांगितले.