Home आरोग्य उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा

उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा

0
24

मुंबई वृत्तसंस्था । ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राऊत यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे केले आहे. राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे आधीच दिसून आले आहे. तर विधानसभाध्यक्ष नाना पटोले हे देखील या विषाणूच्या संसर्गातून नुकतेच बरे झाले आहेत


Protected Content

Play sound