Home Cities जळगाव उमर खालीदसह इतरांना जिल्हाबंदी करावी-भाजपची मागणी ( व्हिडीओ )

उमर खालीदसह इतरांना जिल्हाबंदी करावी-भाजपची मागणी ( व्हिडीओ )


BJP

जळगाव प्रतिनिधी । उमर खालीदसह अन्य लोक हे उद्या जिल्ह्यात येत असून त्यांच्या मुळे शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने त्यांना जिल्हा बंदी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी आज केली. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.

भुसावळ येथे उद्या सभेनिमित्त उमर खलीद, जिग्नेश मेवाणी, योगेंद्र यादव आदी मान्यवर येत आहेत. त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये या मागणीसाठी आज भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना भेटले. संबंधीत लोक हे नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करत असल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना सभेसाठी प्रवेश देऊ नये व त्यांना जिल्हाबंदी करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी आ. स्मिताताई वाघ, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, ललीत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1085167151819015/


Protected Content

Play sound