जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आर.एल. चौफुलीनजीकच्या नेक्सा शोरूम जवळ चहाचे उद्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात सोमवार १० एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश अहिरे रा.साईनाथ साईनगर एमआयडीसी जळगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्याचे माझी टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान सोमवार १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता चहाचे उधारीचे पैसे घेण्यासाठी आकाश अहिरे याचा भाऊ सिद्धार्थ सोमनाथ सरदार आणि दीपक रमेश पाटील हे दोघे शहरातील आर.एल. चौफुली जवळ असलेल्या नेक्सा शोरूम जवळ आले. त्यावेळी उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून सचिन सोनार, आकाश वंजारी आणि इतर दोन जणांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लोखंडी रॉडने सिद्धार्थ सरदार आणि दीपक पाटील यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर सिद्धार्थ सरदार याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन सोनार, आकाश वंजारे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र अशा चौघांनी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.