धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे संत तुकाराम, संत सावता, संताजी जगनाडे महाराज, हिंगलाज माता यांच्या स्मारकाचे उद्घाटन व साहित्यांचे वाटप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संताजी जगनाडे महाराज, हिंगलाज माता यांच्या स्मारकाचे उद्घाटन शुक्रवार दि. ३ जून रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा लहान माळी वाडा मढी जवळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता ग्रामीण रुग्णालय येथे अपंग बांधवांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तरी धरणगाव शहरातील नागरिक बंधु-भगिनी सर्व शिवसेना, युवासेना विद्यार्थी सेना अल्पसंख्याक सेना व्यापारी सेना युवतीसेना नगरसेवक नगरसेविका,नगराध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व समाज अध्यक्ष व उपाध्यक्ष पंच मंडळ समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.