उद्या जिल्हा परिषदेची स्थायी समितीची ऑफलाईन सभा

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषद स्थायी समिती सभेचे शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सानेगुरुजी सभागृहात ऑफलाईनपद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

 

जिल्हा परिषदेच्या २४ कोटींपैकी १८ कोटींचे असमान नियोजन झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्या प्रा. डॉ. निलम पाटील यांनी मंत्रालयात तक्रार केली होती. यापूर्वीदेखील सिंचन व बांधकाम विभागाची मंजूर कामे असा एकूण ४०कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशा प्रकारे निधीच्या असमान नियोजन, ग्रामपंचायतींची वसुली आदी विषयांवर उद्या होणारी स्थायी समितीची सभा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यामान पदाधिकार्‍यांसह सदस्यांचा कार्यकाळ दि. २० मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी आपआपल्या गटात कामे मंजूर करण्यासाठी सत्ताधारी पदाधिकार्‍यांसह सदस्यांची धावपळ सुरु होती. मात्र, जिल्हा परिषदेला मंजूर झालेल्या २४ कोटींच्या नियोजनात भेदभाव करुन असमान निधी वाटपावरुन सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी थेट मंत्रालयात तक्रार केली. त्यामुळे यापूर्वी मंजूर कामांसह ४० कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. चौकशी समितीकडून त्रुटीमुळेअहवाल रेंगाळला आहे. यापूर्वी जि.प. स्थायी समितीची सभा ऑनलाईन घेण्यासंदर्भात नियोजन सुरु होते. मात्र विरोधीसदस्यांमधून ऑफलाईन सभा घेण्याची मागणी केली होती. त्यावरुन ही सभा ऑनलाईनऐवजी आता ऑफलाइन घेण्यात येणार आहे.

Protected Content