Home राज्य उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा

उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा


मुंबई- उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. यासाठी क्युआर कोडची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे


Protected Content

Play sound