शुक्रवारपासून या ‘पाच’ रेल्वे गाड्या धावणार

 

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात अनलॉक नंतर जनजीवन सुरळीत होत असतांना शुक्रवार ९ आक्टोबर रोजीपासून पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

९ ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या कोरोना काळात विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत. यासाठी गुरुवार, ८ ऑक्टोबरपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे गाडीत प्रवेश करताना, प्रवास करत असताना व उतरण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगानं सर्व नियम पाळणे गरजेचे आहे, असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबई लोकलबरोबरच एक्स्प्रेस गाड्यांचीही लोकांना प्रतीक्षा होती. सरसकट सर्व रेल्वे गाड्या कधी सुरू होणार याविषयी अद्याप कुठलीही स्पष्टता नसली तरी टप्प्याटप्प्यानं सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

Protected Content