पुणे (वृत्तसंस्था) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा उद्या (मंगळवार) पासून सुरु होत आहे. राज्य भरातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 05 हजार 027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 036 परीक्षा केंद्र आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच गणित, कला आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी अनेक विषयांच्या पेपरमध्ये एक दिवसांची सुट्टी देण्यात आला आहे. तर कॉपीला आळा घालण्याच्या दृष्टीने मंडळातर्फे राज्यात 273 भरारी पथकं नेमण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबईतल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.