उद्यानाचे काम रखडले : शासनाचा लाखोंचा निधी पाण्यात

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील नगर परिषदच्या अंतर्गत विस्तारित वसाहतीमधील तिरूपती नगरातील राखीव खुल्या भुखंडावरील उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे काम गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. हे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

 

यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विस्तारीत क्षेत्रातील नविन वसाहतीमधील तिरूपती नगरातील खुल्या भुखंडावरील जागेवर ७० ते ८० लाख खर्चाचे उद्यान उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम मागील एक ते दीड वर्षांपासून सुरु करण्यात आले आहे. मात्र, मागील  महीन्यापासून या उधानाचे काम पुर्णपणे बंद आहे. उद्यानाचे काम रखडल्याने परिसरातील रहिवासी असलेल्या महीला व बालकांचा आणि नागरीकांचा हिरमोड झाला आहे.   उद्यान उभारण्यात होत असलेल्या सर्व गोंधळाला जबाबदार कोण ? याची सखोल चौकशी करून संबधीत ठेकेदाराकडून हे सदरचे रखडलेले काम पुर्ण करावीत अशी अपेक्षाकृत मागणी प्रशासक फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्याकडून  तिरुपती नगर परिसरातील नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Protected Content