उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद, मुख्यमंत्री म्हणून निष्क्रिय ; नारायण राणेंची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, अशा शब्दात भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

 

यावेळी नारायण राणे म्हटले की, जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे.महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही, बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेच नाहीत, सरकार अस्तित्वात आहे की नाही?, असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला. तसेच गेल्या अनेक महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीतून बाहेर पाऊल टाकलेले नाही. ते बाहेर पडले तरी फार काही बोलत नाहीत. अनेक महिने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी आदेश पाळत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोणी ठेवणारही नाही. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही, त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती आणि त्या मागणीवर मी ठाम असल्याचेही नारायण राणे म्हणाले.

Protected Content