उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती : निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वत:साठी नशिबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालं आहे. आता आमदारकीदेखील राज्यपालांनी बसल्याठिकाणी दिली, अशी जहरी टीका माजी खासदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हाच मुद्दा पकडून नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हटले की, उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वत:साठी नशिबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालं. आता आमदारकीदेखील राज्यपालांनी बसल्याठिकाणी दिली. मुख्यमंत्रीपद काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा… ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही, असेही निलेश राणेंनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Protected Content