उत्राण येथे दोन गटात तुफान हाणामारी ; चौघांविरुद्ध गुन्हा

 

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील उत्राण येथे दोन गटात किरकोळ कारणावरून २६ फेब्रुवारीला तुफान हाणामारी झाली होती. याप्रकरणी आज चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सुरेखा पीरण कोळी या आपल्या राहत्या घराच्या अंगणात सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाहेर निघाल्या. यावेळी मुलाने खोड काढली म्हणून आईने त्याला शिवी दिली. त्यावर शेजारी असलेल्या संतोष बालू कोळी, आशाबाई कोळी, बालू देवराम कोळी, सुकलाल बालू कोळी यांनी सुरेखा कोळी यांना विचारणा केली की, शिवी कोणाला दिली?. यावरून त्यांच्यात शाब्दीक वादंग झाला. थोड्याच वेळात याचे रुपांतर हाणामारी झाली. सुरेखा कोळी व पती पिरण कोळी यांना मागील भांडणाचा वचपा काढत सुरेख कोळी यांना अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण करून सुरेखा कोळी यांच्या डोक्यात कुकरच्या झाकणाने वार केला. त्यात सुरेखा कोळी या जबर जखमी झाल्या. त्यांना कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारित झाल्याने आज दि. ११ मार्च रोजी कासोदा पोलीस स्टेशनला भाग नं. ५ भांधवी कलम ३२४ , २९४ , ३२३ , ५०४ , ५०६ / ३४ विविध कलमान्वे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नंदकुमार पाटील करीत आहेत.

Protected Content