उत्राण, ता. एरंडोल, प्रतिनिधी । येथील आई एक संकल्प बहुउद्देशिय संस्था ,लोहार गल्ली यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
आई एक संकल्प बहुउद्देशिय संस्थेद्वारा उत्राण येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल पं सचे उपसभापती अनिल महाजन हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनीता मोरे, आरोग्य सेविका व्ही. एस. अहिरे, अंगणवाडी सेविका शोभा खैरनार, माधुरी देशपांडे, आशा सेविका भारती वाघ, महिला भजनी मंडळ अध्यक्ष प्रमिला पाटील ,संघवी स्कूल चे चेअरमन शितल माळी, अंकिता महाजन, गणेश चौधरी, संतोष मोरे, युवराज कोळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनाली बडगुजर, राजाराम माळी, शिवराम कोळी कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलन करण्यात आले. आलेल्या महिलांचा संस्थांचे संस्थापक अध्यक्ष मुकेश सूर्यवंशी यांचा वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कुवर यांनी केले. यावेळी आरोग्य सेविका अहिरे यांनी सांगितले की, महिलांनी चूल व मुल या गोष्टीत न अटकता विविध क्षेत्रात उंच भरारी घ्यावी व मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असे आवाहन केले. अनिल महाजन यांनी सांगितले की, महिलांना, नीलिमा मिस्रा यांनी ज्या पद्धतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला व गगन भरारी घेऊन, विदेशांत नाव लौकिक केले ,तुम्ही सुद्धा बचत गटांच्या माध्यमातून उद्योग सुरू करावा. ,प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या महिलांचे हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अजय सोनवणे, अशोक चौधरी, राहुल लोहार, सुशील माळी, रवी शिरसाठ, अनिल सोनवणे,प्रकाश कुवर, महिला सदस्य शोभा सोनवणे, इंदूबाई शिरसाठ तसेच गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.