अमळनेर, प्रतिनिधी | उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ संघटना अमळनेर युवा तालुकाध्यक्षपदी भाऊलाल नवल हटकर व संपर्कप्रमुखपदी संदीप दिलीप मासुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार प्रणालीवर चालून व आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ संघटना काम करत आहे. भाऊलाल हटकर व संदीप मासुळे(रा. चोपडाई ता. अमळनेर) यांची निवड संस्थापक सल्लागार देविदास बापूसाहेब हटकर व अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी व जिल्हाध्यक्ष धुळे चेतन भाऊ , विठ्ठल मारनर , प्रविण हाके यांच्या शुभहस्ते नियुक्ती करण्यात आली. रमेश पवार, कृष्णकांत परदेशी, दुर्गेश खांडेकर उपस्थित होते. हटकर व मासुळे यांचे सामाजिक कार्य बघून त्यांची निवड केली आहे.