भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग ६ वरील उड्डाणपूलांवर शहीद कोरोना योद्ध्यांच्या नावे शिलालेख उभारण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक, वैद्यकीय आघाडीचे डॉ. नि.तु पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
भुसावळ शहरांमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून त्यावर विविध ठिकाणी उड्डाणपुलांचे कार्य प्रगतिपथावर आहे. शहरात व परिसरात जवळपास ७ उड्डाण पुल उभारण्यात येणार आहेत. या ७ पैकी एका उड्डाणपुलावर भुसावळ शहर जन्मभूमी व कर्मभूमी असणारे कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योध्यांची नावे असलेला शिलालेख उभारण्यात यावा अशी मागणी डॉ. नि.तु पाटील यांनी केली आहे. या शिलालेखातून कोरोना योद्धे व त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान होईल अशी भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. या शिलालेखावर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी स्व. श्रीप्रकाशकरणसिंग तुरकुले, स्व. विजय राजपुत आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील सहाय्यक फौजदार स्व. आनंदा सोनू गजरे, सहाय्यक फौजदार स्व. एजाज पठाण तसेच शहरातील प्रत्येक क्षेत्रांमधील वैद्यकीय, महसूल विभाग, शिक्षक,रेशन विभाग,वृत्तपत्रे वाटप आदी आदी क्षेत्रांमधील जनतेची सेवा करता करता कोरोना महामारीमध्ये शहीद झाले असतील अशांची अग्रक्रमाने र नावे लिहिली जावीत अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/736140303691887