उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी

 

 

भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे अनेक महिला व मुले जखमी झाली.

 

मंदिरात उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अति महत्त्वाच्या लोकांसह मंदिरात गर्दी झाली होती, यामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या होत्या.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मंदिराच्या गेट नंबर ४ वरून भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दुर्घटना टळली आणि कोणाच मृत्यू झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

 

बॅरीकेड पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कोरोना सूचनांचे उल्लंघन करण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

महाकाल मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, ५,००० लोकांना मंदिरात जाण्यास पूर्वीच परवानगी देण्यात आली होती. परंतु श्रावनाचा पहिला सोमवार असल्यामुळे ६० हजार भाविक देशभरातून आले होते,  भोपाळपासून १७५ कि.मी. अंतरावर उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

 

Protected Content