यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद येथे मुलीची बदनामी का करतो असे जाब विचारण्यास गेलेल्या भावास व मुलीसह वडिलांना सार्वजनिक ठिकाणी एका गटाने शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल एका गटातील आठ तर दुसर्या गटातील १५ जण अश्या दोन गटातील परस्पर विरूद्ध २३ लोकांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उंटावद तालुका यावल येथे काल दि. १० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उंटावद गावातील राहणारे समीर मेहरबान तडवी, रोशन मेहरबान तडवी, गुलाब सायबु तडवी, कुरबान झिपरु तडवी, छबु बाबू तडवी व दोन महिला यांनी फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी अभय सुभाष पाटील यांच्या घरासमोर पाटील हे आपल्या बहिणी सोबत समीर तडवी यास मुलीची बदनामी का करतो असे विचारणा करण्यासाठी गेले असता याचा राग येऊन संशयित आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांसह बहिणीस शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर बागळीवर दगड विटा फेकून मारून कुटुंबास दुखापत केली म्हणून त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या गटाने परस्पर दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की उंटावद येथील संशयित आरोपी अभय सुभाष पाटील यांनी रोशन मेहरबान तडवी यास सांगितले की तुझ्या भावाला सांगून दे आमच्या मुलीशी प्रेम संबंध ठेवू नये असे बोलण्याच्या कारणावरून संशयित आरोपी सुभाष एकनाथ पाटील, अभय सुभाष पाटील, निलेश राजेंद्र पाटील, पप्पू सुनील पाटील, पंकज कैलास पाटील, अमोल कैलास पाटील, लोकेश सुधाकर पाटील, कमलेश कैलास पाटील, जितेंद्र सुधाकर पाटील, सागर साळुंखे, राहुल रवींद्र पाटील, योगेश अनिल पाटील, पंकज ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र हिलाल पाटील व एक महिला यांनी फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मंडळी जमऊन फिर्यादी रोशन मेहरबान तडवी विटांनी मारहाण करुन जखमी केले. यासंदर्भात स्टेशनला दोन्ही गटातील २३ लोकांविरुद्ध परस्पर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार सहाय्यक फौजदार अजित हमीद शेख पोलीस कर्मचारी सुनिल सोपान तायडे हे करीत आहे.