Home क्राईम ईशान्य दिल्लीत महिन्याभरासाठी कलम १४४ लागू

ईशान्य दिल्लीत महिन्याभरासाठी कलम १४४ लागू


delhi
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यामुळे ईशान्य दिल्लीत महिन्याभरासाठी जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

 

ईशान्य दिल्लीत सीएए आणि एनआरसीला विरोधक आणि समर्थकांचे सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल. त्यानंतर आजही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. दोन गटांमध्ये जोरदार दगडफेकही झाली. त्यानंतर कलम १४४ अर्थात जमावबंदीचे कलम दिल्लीमध्ये महिनाभरासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारामुळे आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले.


Protected Content

Play sound