Home राजकीय ईडीच्या कारवाईला घाबरत नाही : आदित्य ठाकरे

ईडीच्या कारवाईला घाबरत नाही : आदित्य ठाकरे

0
50

 

मुंबई प्रतिनिधी । प्रताप सरनाईक व एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून यावरून आदित्य ठाकरे यांनी या प्रकारच्या कारवाईला महाविकास आघाडी सरकार घाबरत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील रस्ते कामांची पाहणी केली. त्यानंतर टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी ईडीच्या नोटीशीवर भाष्य केले. ते म्हणाले की, ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे, असं सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


Protected Content

Play sound