ईडीची नोटीस येणं स्वस्त झालं -प्रफुल्ल पटेल

 

नागपूर वृत्तसंस्था । ईडीची नोटीस येणं स्वस्त झालं असून आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातेय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. हे आता स्वस्त झालंय. ईडीची नोटीस येणं याचं कुणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कुणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. ईडीच्या नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असंही ते म्हणाले.

Protected Content