नवी दिल्ली : सुरक्षा यंत्रणांकडून राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. यापूर्वी स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्यीच शक्यता प्राथमिक चौकशीनंतर व्यक्त करण्यात आली होती.
राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळील झालेल्या बॉम्बस्फोटासाठी छोट्या छोट्या बॉल बेअरिंगचाही वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला घटनास्थळी सॉफ्ट ड्रिंकच्या कॅनचे काही छोटे छोटे तुकडेही मिळालेत. तपास यंत्रणेला स्फोटाच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतिक्षा आहे. दरम्यान, स्फोट झालेल्या भागाजवळच तपास यंत्रणेनं हस्तगत केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित दिसून येत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.