मुक्ताईनगर, प्रतिनिधी | येथील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल यांच्याविषयी २६ जानेवारी रोजी लाईव्ह ट्रेंड्सने बातमी प्रकाशित केली. त्यानंतर राजकीय हालचाली सुरू झाल्या असून भिलला घरकुल मिळावा यासाठी आता मागणी करण्यात येत आहे.
मुक्ताईनगर येथील निलेश भिल रा.कोथळी यांना सन: 2016 ला पाचवी इयत्तेत असताना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सदर कुटुंबीयांना शासकीय किंवा आर्थिक मदत मिळालेली नाही. तसेच
राहण्यास पक्के घर नसल्याने याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्युजने 26 जानेवारी रोजी बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर लागलीच राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान त्यामुळे भिलला किमान अंग झाकण्यासाठी शबरी अथवा पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी एका पत्रकाद्वारे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्याकडे शिफारस केली आहे. यावर बीडीओ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सदर पुरस्कारामुळे फक्त त्याचे प्रतिमा घेऊन समोर जाहिरात झालेली दिसून आली आहे. नुसते अश्रू पुसण्याचे काम झालेले दिसते. ना शिक्षणाला सवलत ना हाती काम धंदा आज ही झोपडपट्टीत राहणाऱ्या भील कुटुंबीय परिवाराला वाऱ्यावर जीवन व्यथित करावं लागतेय. जातीच्या दाखल्यासाठी वंशवळ काढण्यासाठी पुरावे नसल्यामुळे मुळातच जातीचा दाखला मिळू शकत नाही. अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दरम्यान जर का ग्रामपंचायत कार्यकारणी ने त्याला लेखी स्वरूपात ग्रा. प. कार्यालयातून रहिवाशी पुरावे जर का दिले तर तालुका स्तरावरून आम्ही पाठपुरावा करून जिल्हा स्तरावर घरकुल साठी मागणी करण्यास तयार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर परिस्थितीला पाहून निलेश भील यांना मदत मिळालाच हवे. त्यासाठी मधुकर भोई यांनी जिल्हा वरून ग्राम विकास मंत्री मुंबई प्रर्यंत पाठपुरावा करण्यासही त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष मधुकर भोई, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भोई, विधान सभा जनहित कक्ष अध्यक्ष अतुल जावरे, गट अध्यक्ष यश पाटील, तेजस पाटील, सचिन पाटील,पंकज बोंडे, अक्षय देशमुख, दुर्गेश देशमुख, निलेश देशमुख गौरव दाणी, विनोद पाटील, अरुण नागरुत किशोर पेटारे आदी पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते.