जळगाव प्रतिनिधी । येथील ईकरा शिक्षण संस्था द्वारा संचालित एच.जेथीम महाविद्यालय च्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीयस्तरीय ऑनलाईन एचटीएमएल व सीएसएस प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात आयोजित करण्यात आली.
सध्या संपूर्ण देशात ‘कोवीड-१९’ साथीच्या आजारांमुळे महाविद्यालयातील अध्ययन अध्यापन कार्य बंद असून प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर तृतीय वर्षाचे परीक्षा बाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी व शिक्षकांचे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान समृद्ध करण्या करीता सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .लाकडाऊन मुळे सदर उपक्रमाच्या विद्यार्थी व शिक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. या प्रश्नमंजुषाची नोंदणी ६ जून ते ९ जून २०२० या कालावधीत उपलब्ध होती. या स्पर्धेत ९२५ परीक्षार्थींनी सहभाग घेतला. परीक्षेत एकुण पन्नास प्रश्न होते.
सर्व उत्तीर्ण परीक्षार्थींना ई-मेल द्वारा सर्टीफिकीट प्रदान करण्यात आले. परीक्षेच्या आयोजन करिता आयटी विभागाचे प्रमुख प्रा. फरहान शेख यांनी परिश्रम घेतले. ह्या उपक्रमाचे आयोजन प्रा. फरहान शेख यांनी केल्याबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार ,डॉ. इकबाल शाह, प्राचार्य डॉ. सैय्यद शुजाअत अली, डॉ. इरफान शेख, डॉ. राजू गवरे, डॉ. वकार शेख, डॉ. हाफिज शेख, डॉ. फिरदौस शेख, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. राजेश भामरे यांनी अभिनंदन केले.