Home क्राईम इंद्रनिल सोसायटीत घरफोडी : रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

इंद्रनिल सोसायटीत घरफोडी : रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

0
32

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा शिवारातील इंद्रनिल सोसायटीमध्ये घरफोडी झाल्याची घटना सोमवार दि. २३ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील पिंप्राळा शिवारातील इंद्रनिल सोसायटी परिसरात संध्या नितीन येवले या वास्तव्यास आहेत. दि. ९ ते २३ रोजी दरम्यान, त्यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारीत घरातील साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून १९ हजार ५०० रुपयांचा टीव्ही, २४० रुपयांची चांदीची अंगठी, ५०० रुपयांची तुळशीची माळ असा एकूण २० हजार २४० रुपयांचा ऐवज लांबवून नेला. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी संध्या येवले यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. संजय सपकाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound