अमळनेर (प्रतिनिधी) धुळे येथील शिव संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. त्यात येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक पी.एम. ठाकरे यांनी ‘जाणता राजा, शिवाजी राजा’ या विषयावर निबंध सादर केला होता. त्यांच्या निबंधाची निवड होऊन त्यांना रोख ७५१ /- रु., प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन गौरवण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने मुख्याध्यापक संदीप पवार, सुनील पाटील, पी.एस.विंचूरकर, पर्यवेक्षक डी.एन. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच स्वाती पाटील, सुषमा तेले, वंदना जाधव, वंदना पाटील, रोहिणी ताडे, भारती चव्हाण, छाया निकम यांनीही त्यांचे अभिनंदन केले. डी.ए. सोनवणे यांनी यावेळी अशोक राणा लिखीत ‘वर्ण वर्चस्वाच्या विरोधात शिवरायांचा संघर्ष’ आणि सूर्यकांत कदम लिखित ‘परिवर्तनकार गुरू रविदास यांचे विचार काल, आज, आणि उद्या’ ही पुस्तके त्यांना भेट दिली. यावेळी श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, श्री.एन.टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, स्व.सौ.पी.एन. मुंदडा माध्यमिक विद्यालय आणि स्व.श्री.एम.एस.मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी.एम. ठाकरे यांचे संस्थाध्यक्ष प्रकाश मुंदडा, चिटणीस नरेंद्र मुंदडा, सहचिटणीस योगेश मुंदडा चेअरमन बाळासाहेब महाजन, सल्लागार एस.टी. पाटील, यांनीही अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.ए. सोनवणे यांनी केले.