जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांच्या विविध न्याय मागण्यांकरीता स्थापित झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समितीत सदस्यपदी म्हणून डॉ.मंगेश पाटे (डोंबिवली)यांची निवड झाली आहे. आज ३ मे रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयास त्यांनी भेट दिली असता गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सत्कार केला.
सहा सदस्यांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत डॉ.मंगेश पाटे यांची निवड डॉ.अनिलकुमार नायर यांनी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये राष्ट्रीय पातळीवरील डॉ.मंगेश पाटे यांचे कार्य वाखाण्याजोगे कार्य आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत संघटनांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठविलेला असून अनेक उपायही सुचविले आहेत. पुढील वर्षी होऊ घातलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यस्तरीय अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी ते उमेदवार असून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, आयएमएचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ.विलास भोळे, सुप्रसिद्ध डी एम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड हे उपस्थीत होते.