मुंबई प्रतिनिधी । वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्यासह त्याच्या सीएला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी काल शुक्रवारी ईडीने हितेंद्र ठाकूर यांच्या नातेवाईकांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्या होत्या. या कारवाईनंतर ईडीने मेहूल ठाकूर आणि मदन गोपाल चतुर्वेदी या दोघांना काल संध्याकाळी 6 वाजता ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. या ठिकाणी दोघांची सुमारे चार ते पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही मध्यरात्री अटक करण्यात आली. आज सकाळी या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. मेहूल ठाकूर हा विवा ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर मदन हा डायरेक्टर आहे.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराच्या मालकीच्या विवा ग्रुपवर काल धाडी मारण्यात आल्या होत्या.