Home धर्म-समाज आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते निराधार महिलांना धनादेश वाटप

आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते निराधार महिलांना धनादेश वाटप

0
28


 

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील २० निराधार महिलांना आधार देण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले आहे.

घरच्या कर्ता व्यक्ती गेल्याने निराधार झालेल्या २० गरीब कुटुंबातील महिलांना कुटुंब अर्थ साहाय्य योजने अंतर्गत आज तहसिल कार्यलायत आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक राजीव पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तहसीलदार देवगुणे, सजंय गांधी निराधार नायब तहसीलदार श्री. खारे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound