जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर परिसर मंडळ क्रमांक एकतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवाजीनगर परिसरात सुभाषतात्या शौचे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक नवनाथभाऊ दारकुंडे रेशन दुकान २/१ शिवाजीनगर परिसरात आर्सेनिक अल्बम-३० रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप करण्यात आले ३०० लोकांपर्यंत गोळ्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मंडळ अध्यक्ष रमेशभाऊ जोगी , नगरसेवक राजूभाऊ मराठे, नवनाथभाऊ दारकुंडे, सरचिटणीस शांताराम गावंडे, संजय शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेशभाऊ पुरोहित, पवन कोळी, राजू भोई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.