शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आमदार गिरीश महाजन यांनी निरामय सेवा संस्था, जी. एम. फाउंडेशन, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर सेवाभावी संस्थांचे वतीने जिल्ह्यातील सर्व डॉक्टर व पोलिसांना पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आज शेंदूर्णी येथील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी राहुल निकम, डॉ. कल्पक साने, डॉ. विजयानंद कुलकर्णी, डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. अजय सुर्वे, डॉ. देवानंद कुलकर्णी. यांच्यासह डॉ. निलम अग्रवाल, डॉ. बारी, डॉ भगवान बैरागी, डॉ.अतुल पाटील, डॉ. नवाल, डॉ.शिंदे , डॉ. पाटील, डॉ.माळी आदी उपस्थित होते. त्यांना नगराध्यक्ष विजयाताई खलसे, उपनगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल, नगरसेवक निलेश थोरात, शरद बारी, गणेश पाटील, शाम गुजर, राहुल धनगर, अलीम तडवी, स्वीकृत सदस्य श्रीकृष्ण चौधरी, शाकिर पिंजारी, संजय गायकवाड, शंकर बारी, अमृत खलसे, गोविंद अग्रवाल यांच्याहस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत व कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्याचे हेतून या किटचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोशल डिस्टन्स पाळणे, निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी कर्मचारी वर्गाला सुरक्षा किट पुरविणे, दैनंदिन स्वच्छता राखणे इत्यादी उपाय योजना करण्यात येत आहे. सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, डॉ.राहुल निकम यांनी मार्गदर्शन केले.