आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने वीज वितरण व सोयी-सुविधांसाठी एक कोटींचा निधी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील दहा गावांच्या विज वितरणच्या सुविधांसाठी डीपीडीसी कडून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

चाळीसगाव  वर्षानुवर्ष प्रलंबित असणार्‍या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने अनेक गावांना व वस्त्यांना पुरेश्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नव्हती तसेच अनेक ठीक वीज होती मात्र त्यावरील भार वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे अश्या समस्या निर्माण होत होत्या. तसेच विजेचे खांब जीर्ण झाल्याने ते धोकेदायक झाले होते. तसेच काही ठिकाणी महापुरात विजेचे खांब वाहून गेल्याने ते बदलणे आवश्यक होते.

 

या संदर्भात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना मधून चाळीसगाव तालुक्यातील वीज वितरण सबंधित सोयी सुविधांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यातून १० गावांच्या विविध समस्या मार्गी लागणार आहेत.

Protected Content