जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले असल्याचा पाहायला मिळत आहे. मंगळवार, २७ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन तानाजी सावंत यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
उस्मानाबाद येथे शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपारे वक्तव्य केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तानाजी सावंत यांचा राजीनामा घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी यावेळी आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला महानगर महिला अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मिक पाटील, सुमित पाटील , यशवंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सरकारमधील शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत अशा पद्धतीचे गैरवर्तन करत असतील तर ही निश्चितच चुकीचे बाब आहे. तानाजी सावंत यांचा राजीनामा घेऊन त्यांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.